अँब्युलन्स बनली ह्यूजेसच्या मृत्यूचे कारण?

 ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेस यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगत दुःखाच्या सागरात बुडले आहे. सर्व ठिकाणी या क्रिकेटरची चर्चा होत आहे. चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात सर्वांसमोर ती अँब्युलन्स आली आहे, जी त्या दिवशी १५ मिनीट उशीराने पोहचली होती. 

Updated: Nov 28, 2014, 11:37 AM IST
 अँब्युलन्स बनली ह्यूजेसच्या मृत्यूचे कारण? title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेस यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगत दुःखाच्या सागरात बुडले आहे. सर्व ठिकाणी या क्रिकेटरची चर्चा होत आहे. चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात सर्वांसमोर ती अँब्युलन्स आली आहे, जी त्या दिवशी १५ मिनीट उशीराने पोहचली होती.

या संदर्भात सिडनी मॉर्निग हेराल्ड दिलेल्या बातमीनुसार क्रिकेट ग्राऊंडमध्ये जखमी झाल्यावर पडलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेसला घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स १५ मिनीट उशीराने पोहचली. इतकेच नाही तर अँब्युलन्ससाठी दोन वेळा फोन करावा लागला. एनएसडब्ल्यू अँब्युलन्स कमिश्नर रे  क्रिन याला या प्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे.

बातमीनुसार ह्युजेस जखमी झाल्यानंतर सहा मिनिटांनंतर स्थानिक वेळेनुसार २.२९ मिनिटांनी पहिला फोन अँब्युलन्ससाठी गेला. पण आठ मिनिट झाले तरी अँब्युलन्स पोहचली नाही. तेव्हा २ वाजून ३७ मिनिटांनी पुन्हा एकदा फोन करण्यात आला. त्यानंतर न्यू साउथ वेल्स अँब्युलन्सने तोपर्यंत जवळ असलेल्या प्रिंन्सेस ऑफ वेल्स हॉस्पिटलच्या क्रूला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये पाठवले. ही अँब्युलन्स ७ मिनिटांनी म्हणजे २ वाजून ४४ मिनिटांनी मैदानावर पोहचली. म्हणजे अँब्युलन्स पोहचायला पहिला कॉल केल्यानंतर ती १५ मिनिटांनंतर पोहचली. 

तर पहिला कॉल केल्यावर जी अँब्युलन्स पाठविण्यात आली होती ती २३ मिनिटांनंतर २ वाजून ५२ मिनिटांनी पोहचली. सिडनीमध्ये एखाद्या व्यक्तीचे प्राण संकटात असतील तेव्हा अँब्युलन्स ८ मिनिटात पोहचते. अँब्युलन्सला ००० वर पहिला फोन करण्यात आला त्याननंतर एनएसडब्ल्यू टीमचे विकेटकीपर पीटर नीविल ग्राऊंड सोडून अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी ग्राऊंडच्या गेटवर गेला. 

जखमी झाल्यानंतर ३ वाजून ३० मिनिटांनी ह्युजेसला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर ४.१५ मिनिटांनी शस्त्रक्रिया करण्यात आली. डोक्यात रक्तश्राव होऊ नये, यासाठी हि शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो कोमामध्ये गेला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.