विराट कोहलीला भेटण्यासाठी तिने थेट लंडन गाठलं

विराट कोहली या युवा फलंदाजाला भेटण्यासाठी बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्काने विशेष लंडन वारी केली आहे. टीम इंडिया सध्या लंडन दौऱ्यावर आहे. 

Updated: Jul 8, 2014, 07:56 PM IST
विराट कोहलीला भेटण्यासाठी तिने थेट लंडन गाठलं title=

लंडन : विराट कोहली या युवा फलंदाजाला भेटण्यासाठी बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्काने विशेष लंडन वारी केली आहे. टीम इंडिया सध्या लंडन दौऱ्यावर आहे. 

विराटला प्रपोज करणाऱ्या डॅनियल वेटला भेटून चार दिवस नाही झाले आणि विराटच्या प्रेमकहाणीत आणखी एक नवा ट्विस्ट आलाय. कारण आता विराट आणि अनुष्काच्या भेटी गाठी पुन्हा सुरू झाल्या आहेत.

अनुष्काचं विराटला भेटण्यासाठी लंडनला धावून जाणं यामागेही एक कारण आहे. कारण मागील दीड वर्षापासून अनुष्का शर्मा परदेशात शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जोया अख्तरचा सिनेमाचं शुटिंग सध्या तुर्कीत सुरू आहे, यात वेळेत वेळ काढून अनुष्कानं लंडन गाठलंय.

विराटची प्रेम कहाणी नावाप्रमाणे विराट होत चालली आहे, यापूर्वी विराट न्यूझीलंड दौऱ्यावर होता, तेव्हा अनुष्कानं ऑकलंड गाठलं होतं, आता लंडन गाठलं आहे.

विराट एक फॅन्स म्हणून डॅनियल वेट भेटली, पण यामुळे अनुष्काच्या प्रेमाची मनात आणखीनंच जास्त खलबतं सुरू झाली. म्हणूनच की काय अनुष्का विराटच्या भेटीला थेट लंडनला निघून आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.