टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

Updated: Oct 26, 2015, 11:57 AM IST
टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री title=

मुंबई: पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

आणखी वाचा - टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

ज्या पिचवर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी भारतीय बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली, त्यावर टीम सुद्धा नाराज होती. कारण पिच खूप जास्त सपाट होती आणि भारतीय टीमच्या तिनही स्पिनर्सची चांगली धुलाई झाली. मॅचनंतर कॅप्टन महेंद्र सिंह धोनी यानंही पत्रकार परिषदेत सांगितलं की, विकेट जास्त सपाट असल्यानं स्पिनर्सना त्रास झाला आणि नंतर बॅट्समनसाठी ४३८ रन्सचं लक्ष्य गाठणं कठीण झालं.

मॅच हरल्यानंतर झाला वाद

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिचवरून शास्त्री आणि नाईक यांच्या खूप वाद झाला. मॅचनंतर जेव्हा रवी शास्त्री आपल्या रूमकडे आले तेव्हा त्यांनी पिचवरून नाईक यांच्यावर ताशेरे ओढले. यावर नाईक यांनीही पलटवार करत म्हटलं की, पिचवरून प्रश्न उपस्थित केले नाहीत तर बरं होईल, मी सुद्धा टेस्ट क्रिकेटर होतो, आपलं काम मला चांगलं समजतं.

या वादानंतर कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार करण्यात आली नाहीय. मात्र सांगण्यात येतंय की, नाईक MCAच्या अधिकाऱ्यांसोबत शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात तक्रार करणार आहेत. 

आणखी वाचा - LIVE स्कोअरकार्ड: भारत वि. दक्षिण आफ्रिका (पाचवी वनडे)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.