ज्येष्ठ क्रीडा मानशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांचे निधन

ज्येष्ठ क्रीडा मानशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांचे निधन झालेय. नाशिकमध्ये हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. 

Updated: May 12, 2017, 07:59 PM IST
ज्येष्ठ क्रीडा मानशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांचे निधन title=

नाशिक : ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचं नाशिकमध्ये निधन झालंय. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं झालं. त्यांच्या घराजवळीत तरुणांना व्यक्तिमत्व विकास विषयावर आयोजित व्याख्यान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

बाम यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज क्रीडापटूंना मार्गदर्शन केलं होतं. विविध क्रीडा प्रकारातल्या खेळाडूंना त्यांनी बॅड फेजमध्ये अक्षरश: उभं केलं.  भीष्मराज बाम हे १९६३ मध्ये पोलीस उप-अधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू झाले. त्यानंतर १८ वर्षांनी ते प्रतीनियुक्तीवर केंद्रीय गृहखात्यात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. अखेर ते केंद्रीय गुप्तचर खात्यातून पोलीस महानिरीक्षकपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी क्रीडा मानसशास्त्रात मोठं योगदान दिलं. त्य़ांना क्रीडा क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानामुळं राज्य सरकारनं जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

मार्ग यशाचा, संधीचे सोने करणारी इच्छाशक्ती, विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना ही त्यांची गाजलेली पुस्तके. Winning Habits: Techniques For Excellence In Sports हे त्यांचे इंग्रजीतील पुस्तकही चांगले गाजले.