सचिननं अनोख्या पद्धतीनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

क्रिकेटपटू सचिन बेबीनं त्याच्या लग्नाची घोषणा अनोख्या पद्धतीनं केली आहे.

Updated: Dec 30, 2016, 07:59 PM IST
सचिननं अनोख्या पद्धतीनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज  title=

नवी दिल्ली : क्रिकेटपटू सचिन बेबीनं त्याच्या लग्नाची घोषणा अनोख्या पद्धतीनं केली आहे. सचिननं यूट्यूबवर लग्नाच्या आमंत्रणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सचिनचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 1 मिनीट 48 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सचिन त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या जर्सीमध्ये बायकोबरोबर मैदानात क्रिकेट खेळताना दाखवण्यात आला आहे. क्रिकेट खेळतानाच या दोघांनी लग्नाचं आमंत्रणही दिलं आहे.

पाहा लग्नाच्या आमंत्रणाचा अनोखा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच सचिन बेबीनं एना चंडीबरोबर साखरपुडा केला होता. गेल्या दीड वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखत आहेत. एना ही दातांची डॉक्टर आहे. या दोघांचं लग्न 5 जानेवारी 2017 ला केरळच्या थोडुपुजातल्या चर्चमध्ये होणार आहे.