रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा कोरलं नाव

पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. त्यानं अर्जेन्टीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. याआधी रोनाल्डोनं 2008, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता.

Updated: Dec 13, 2016, 03:41 PM IST
रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा कोरलं नाव title=

नवी दिल्ली : पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. त्यानं अर्जेन्टीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. याआधी रोनाल्डोनं 2008, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता.

या सीझनमध्ये ऍटलेटीको माद्रिदला पराभूत करत रिअल माद्रिदनं चॅम्पियन्स लीग जिंकली होती. चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये रोनाल्डोनं पेनल्टी किकवर गोल करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. युरोपियन टुर्नामेंटमध्ये रोनाल्डोनं आपला गोल धडाका कायम ठेवला. आणि त्यामुळेच तो या सीझनचा सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला आहे.