भारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे  की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.

PTI | Updated: Mar 23, 2015, 09:07 PM IST
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क title=

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे  की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.

ऑस्ट्रेलियाकडून २४ टेस्ट आणि ३९ वनडे खेळणारा स्टुअर्ट क्लार्क एससीजीवर बोलतांना म्हटलंय, मला वाटतंय की, या मॅचमध्ये भारताचं पारडं जड आहे. अश्विन एक जागतिक दर्जाचा स्पिनर आहे आणि ऑस्ट्रेलियाजवळ जागतिक दर्जाचा स्पिनर नाही.

क्लार्क म्हणला, असं होऊ शकतं की ऑस्ट्रेलिया टीममध्ये एक तज्ज्ञ स्पिनर ठेवतो. ऑस्ट्रेलिया सर्वश्रेष्ठ १५ खेळाडू निवडेल. पण त्यांना समजायला हवं त्यांच्याजवळ वनडेचा चांगला स्पिनर नाहीय. नाथन लियोन टेस्टमध्ये चांगला स्पिनर आहे. मात्र वनडेमध्ये त्याला खूप कमी संधी मिळाल्यायेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.