आयपीएलमॅच दरम्यान आला भूकंप

इंडियन प्रीमियर लीगच्या ९ व्या सीजनमध्ये ईडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅचदरम्यान भूकंपाचे हादरे बसले ज्यामुळे मीडिया बॉक्समध्ये हालचाली दिसू लागल्या. 

Updated: Apr 17, 2016, 01:28 PM IST
आयपीएलमॅच दरम्यान आला भूकंप title=

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या ९ व्या सीजनमध्ये ईडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅचदरम्यान भूकंपाचे हादरे बसले ज्यामुळे मीडिया बॉक्समध्ये हालचाली दिसू लागल्या. 

खेळाडू आणि जवळपास ३० हजार क्रिकेट फॅन्स हे मैदानावर जोरदार गाणे वाजत असल्याने त्यांना भूकंपाच्या झटके समजलेच नाहीत. चौथ्या माळ्यावर असलेलं प्रेस बॉक्स मात्र चार सेकेंडपर्यंत कापत होतं. प्रेस बॉक्स हे काही पिलर्सवर उभं आहे त्यामुळे अनेकांना धडकी भरली. 

जेव्हा भुकंपामुळे जमीन कापत होती तेव्हा मैदानावर गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे टॉससाठी उपस्थित होते पण त्यांना ही याबाबात काहीच कळालं नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कदाचित याबाबत कोणाला कळालं नसेल पण एका पत्रकाराने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.