गुगलनं का ठेवलं हे डुडल ?

कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.

Updated: Mar 7, 2016, 03:32 PM IST
गुगलनं का ठेवलं हे डुडल ? title=

मुंबई: कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.

आजही गुगलनं एक आगळं वेगळं डुडल ठेवलं आहे. उद्यापासून टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात होत आहे. त्यासाठीच हे डुडल ठेवण्यात आलं आहे.  

गुगलच्या या डुडलवर क्लिक केल्यावर टी-20 वर्ल्ड कपच्या मॅचचं वेळापत्रक दिसतं. तसंच टी-20 वर्ल्ड कपविषयीच्या बातम्याही दिसतात.

उद्यापासून टी-20 वर्ल्ड कपचा क्वालिफायिंग राऊंड सुरु होणार आहे. या क्वालिफायिंग राऊंडनंतर 15 मार्चला भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यामध्ये पहिला सामना होईल. या टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल 31 मार्चला आणि फायनल 3 एप्रिलला होणार आहे.