चिअर लिडर्सही होणार ऑलिम्पियन 'खेळाडू'!

चिअर लीडींग आता अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जाणार आहे. 'आयओसी' अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं चिअर लीडींगला 'मार्शल आर्ट ऑफ मूयाथी'बरोबर ऑलिम्पिक खेळाची मान्यता दिलीय. 

Updated: Dec 16, 2016, 02:05 PM IST
चिअर लिडर्सही होणार ऑलिम्पियन 'खेळाडू'! title=

नवी दिल्ली : चिअर लीडींग आता अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जाणार आहे. 'आयओसी' अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं चिअर लीडींगला 'मार्शल आर्ट ऑफ मूयाथी'बरोबर ऑलिम्पिक खेळाची मान्यता दिलीय. 

संगीताच्या तालावर नाचणाऱ्या चिअर लीडर्स कायमच स्टेडियमच्या बाहेरुन खेळाडूंचा उत्साह त्या वाढवत असतात. मात्र, आता याच चीअर लीडींगला ऑलिम्पिकचा दर्जा मिळालाय. यापुढे चिअर लीडींग ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जाणार आहे. आयओसीकडून या खेळाला निधीही पुरवला जाईल. ज्याचा फायदा या खेळाचा प्रचार आणि प्रसारासाठी होणारच आहे. अमेरिकेच्या व्हर्सिटी स्पिरिटनं या खेळाला ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळख मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. 

ऑलिम्पिक खेळातील एक अडचण म्हणजे यामध्ये अनेक खेळांचा समावेश आहे. जेव्हा एका खेळाचा समावेश होतो. त्यावेळी दुसऱ्या खेळाला बाहेर जावंचं लागतं. मात्र आम्हाला यामुळे शत्रू निर्माण करायचे नाहीत, अंस व्हर्सिटी स्पिरिटनं म्हटलंय. 

चिअर लीडींगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला तुफान यश मिळालं. आणि याचा फायदा हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यात झाला. ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ सहभागी होण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, आता यजमान देशाला त्यांच्या आवडीचे खेळ ऑलिम्पिकमध्ये सहभागी करण्याची मुभा आयओसीनं दिलीय. त्यामुळे आता तयार व्हा चिअर लीडींगच्या स्पर्धेला...