भारत विरूद्ध पाकिस्तान : सामन्याने बनविला वर्ल्ड रेकॉर्ड

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अॅडिलेड येथे झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्याने भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येचा एक रेकॉर्ड बनिवला आहे. या सामन्याला २८ कोटी ८० लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला. 

Updated: Feb 26, 2015, 06:37 PM IST
भारत विरूद्ध पाकिस्तान : सामन्याने बनविला वर्ल्ड रेकॉर्ड  title=

मुंबई :  भारत आणि पाकिस्तान दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अॅडिलेड येथे झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्याने भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येचा एक रेकॉर्ड बनिवला आहे. या सामन्याला २८ कोटी ८० लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला. 

हा सामना २०११ च्या वर्ल्ड कप फायनलनंतर गेल्या चार वर्षात भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक प्रेक्षकांनी हा पाहिला आहे. 

या सामन्याला स्टार नेटवर्कचे सर्व चॅनल आणि दूरदर्शनवर १४.८ टीव्हीआर मिळाले.

स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर यांनी सांगितले की, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपपेक्षा काहीच मोठे नसते आणि भारतीय समर्थकांचा टीम इंडियावर विश्वास आणि क्रिकेट प्रति आस्था यातून दिसून येते. भारत पाकिस्तान सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी अमिताभ बच्चन हे शोएब अख्तर, कपिल देव आणि राहुल द्रविड यांच्यासह उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.