ग्लेन मॅक्सवेलने मुंबई इंडियन्सविरूद्ध एका ओव्हरमध्ये लगावले 6,6,4,4,6 - पाहा व्हिडिओ

 किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार मुंबई इंडियन्स विरोधात पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी करत १८ चेंडूत ४० धावा कुटल्या. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 21, 2017, 04:19 PM IST
ग्लेन मॅक्सवेलने मुंबई इंडियन्सविरूद्ध एका ओव्हरमध्ये लगावले 6,6,4,4,6 - पाहा व्हिडिओ

इंदूर :  किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार मुंबई इंडियन्स विरोधात पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी करत १८ चेंडूत ४० धावा कुटल्या. 

मॅक्सवेलने गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरला होता. पण त्याने या सामन्यात मिशेल मॅक्लेघनच्या पाच चेंडूत २६ धावा कुटल्या. यात 6,6,4,4,6 अशा धावा काढल्या. 

पंजाबच्या हाशिम आमला याने शानदार शतक केले पण बटलर आणि नितीश राणा यांच्या तुफानी खेळी पुढे शतक फिके पडले. पंजाबच्या १९८ लक्ष्याचा पाठलाग करताना २७ चेंडू राखून आठ विकेटने सामना जिंकला.