'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध'

क्रिकेटपटू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्होचा सट्टेबाजाशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.

Updated: Jun 28, 2015, 11:07 PM IST
'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध' title=

मुंबई : क्रिकेटपटू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्होचा सट्टेबाजाशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.

ललित मोदींना मदत केल्याचा सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्यावर आरोप आहे. ललित मोदींनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. आता त्यांनी सट्टेबाजाशी संबंध असणाऱ्या खेळाडूंचीच नावे जाहीर केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी हा नवा खुलासा केला आहे. 

मोदींना नावे घेतलेली तिन्ही खेळाडू आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आहेत. ललित मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे, की क्रिकेटपटूंचे सट्टेबाजाशी संबंध असल्याच्या संशयावरून मी जून २०१३ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पत्र लिहिले होते. त्यावर त्यांना जे योग्य वाटते, ते करण्यास मी त्यांना सांगितले होते. रैना, जडेजा आणि ब्राव्हो यांचे रियल इस्टेट क्षेत्रातील बाबा दिवान याच्याशी जवळचे संबंध आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.