बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले. 

PTI | Updated: Sep 18, 2015, 08:32 AM IST
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात title=

कोलकाता :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले. 

अधिक वाचा : Video_ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त घेतली कॅच

दालमियांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून नाजूक होती. मात्र गुरुवारी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना नऊच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,  सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

अधिक वाचा : 17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक!

त्यांच्यासोबत पुत्र अभिषेक असून भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरभ गांगुली उपस्थित आहेत. दालिमियांची माहिती मिळताच पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांच्यासह बंगाल क्रिकेट बोर्डाच्या काही पदाधिका-यांनी बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झालेत. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.