17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक!

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी 20 सामन्यादरम्यान एका खेळाडून अशी काही खेळी खेळलीय की उपस्थितांना 'आ' वासून पाहण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. 

Updated: Sep 8, 2015, 05:39 PM IST
17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक! title=

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी 20 सामन्यादरम्यान एका खेळाडून अशी काही खेळी खेळलीय की उपस्थितांना 'आ' वासून पाहण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. 

पाकिस्तानचा बॅटसमन मुख्तर अहमद यानं हा रेकॉर्ड नोंदवलाय... असा रेकॉर्ड पाकिस्तानच्या जमिनीवर टी 20 च्या इतिहासात कोणताही खेळाडू नोंदवू शकलेला नाही.

सियालकोट रिजन आणि कराची रिजनमध्ये सुरु असलेल्या सामन्यात सियालकोटनं टॉस जिंकून सुरुवातीला बॅटींगचा निर्णय घेतला. मुख्तारच्या रेकॉर्डब्रेक शतकामुळे त्यांनी प्रतिस्पर्धी टीमसमोर 199 रन्सचं टार्गेट उभारलं.

ओपनर मुख्तार अहमद यानं नौमान अन्वर याच्यासोबत मिळून 125 रन्सची भागीदारी केली आणि तब्बल 123 रन्स ठोकले. टी 20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानी जमिनीवर कोणत्याही खेळाडूला अशी खेळी आजवर शक्य झाली नव्हती. 

मुख्तारनं 67 बॉल्सचा सामना केला. यामध्ये त्यानं 17 चौकार तर 3 सिक्स ठोकले. 183 च्या स्ट्राईक रेटवर त्यानं ही तुफानी खेळी खेळलीय. 

मुख्तारनं पाकिस्तानसाठी पाच टी 20 सामने खेळलेत. यामध्ये त्यानं 37 च्या अॅव्हरेजनं 188 रन्स बनवलेत. नुकत्याच झालेल्या झिम्बॉम्वे दौऱ्यावर मुख्तारनं दोन्ही टी 20 सामन्यात अर्धशतकही ठोकलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.