ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच

टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.

Updated: Mar 26, 2016, 06:40 PM IST
ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच title=

कोलकता: टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे. या विजयामुळे न्यूझीलंड यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही अजिंक्यच आहे. 

ग्रुप स्टेजमध्ये खेळलेल्या पहिल्या चारही मॅच जिंकून न्यूझीलंडकडे आता 8 पॉईंट्स आहेत. किवींना सेमी फायनलचं तिकीट तिसरी मॅच जिंकल्यावरच मिळालं होतं. पण बांग्लादेशची मॅचही जिंकत केन विलियमसनच्या संघानं वर्ल्ड कप विजयाचे आपणच प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. 

तर बांग्लादेशनं मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये निराशा केली आहे. ग्रुप स्टेजच्या चारही मॅचमध्ये बांग्लादेशला पराभवाला सामोरं जावं लागलं. 

या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, आणि 20 ओव्हरमध्ये 145 रन केल्या. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलियमसननं सर्वाधिक 42 रन केल्या. 

त्यानंतर 146 रन गाठण्यासाठी आलेल्या बांग्लादेशची सुरवातीपासूनच पडझड झाली, आणि त्यांचा फक्त 70 रनवर ऑल आऊट झाला. इश सोदी आणि ग्रँट एलियटनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.