भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Updated: Nov 10, 2015, 04:49 PM IST
भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद title=

मुंबई : सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

बीसीसीआयचे सदस्यही भारतीय आहेत. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी शक्य नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे, आत्तापर्यंत पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय... आणि हे खूप गंभीर आहे. असं किर्ती आझाद यांनी 'एएनआय'शी बोलताना म्हटलंय. 

अधिक वाचा - डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...

अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत डिसेंबर महिन्यात होणारी भारत - पाकिस्तान सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.

'शिवसेनेची गुंडगिरी योग्य नव्हे...'
पीसीबी आणि बीसीसीआय दरम्यान होणारी चर्चा उधळून लावल्याबद्दल त्यांनी शिवसेनेवरही तोंडसुख घेतलंय. तुमचा विरोध तुम्ही नक्कीच दर्शवू शकता... पण, बळाचा वापर करून लोकांना चुकीच्या पद्धतीनं वागवू शकत नाहीत... आपला विरोध दर्शवण्याचा हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे... ही गुंडगिरी आहे, असं आझाद यांनी म्हटलंय.  

बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार 2015 ते 2023 या कालावधीमध्ये सहा सीरिज खेळवणं बंधनकारक आहे. यातील चार सीरिज या पाकिस्तानात खेळल्या जाणार आहेत. पाकिस्तान टीम यापूर्वी 2012-13 मध्ये भारतीय दौऱ्यावर आली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.