भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

PTI | Updated: Aug 25, 2015, 03:21 PM IST
भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड title=

कोलंबो : श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

एक नजर रेकॉर्डवर
१. टीम इंडियाला १० कसोटी सामने खेळल्यानंतर विजय मिळाला. याआधी टीम इंडियाने गतवर्षी जुलैमध्ये लॉर्डसवर विजय मिळाला होता.
२. दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या २७८ रन्सच्या विजयामुळे टीम इंडियाची चौथा सर्वात मोठा विजय आहे. परदेशी दौऱ्यात हा दुसरा मोठा विजय आहे.
३.अश्विनने दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या सत्रात ५ विकेट घेऊन श्रीलंकेला बॅकफूटवर आणले. या सामन्यात त्यांने ७ विकेट घेतल्या. या विकेटसह श्रीलंकेबरोबर सर्वाधिक विकेट घेणारा तो पहिला ठरला. त्याने हरभजन सिंगचा २००८चा १६ विकेटचा विक्रम मोडीत काढला.
४. अजिंक्य रहाणे याने १२६ रन्स करत श्रीलंकेत तिसरा भारतीय बॅट्समॅन ठरला.
५. २००८नंतर पहिल्यांदा कसोटीत दुसऱ्या सत्रात टीम इंडिया टॉप थ्रीत दोन खेळाडूंनी ८० + स्कोअर केला. याआधी वीरेंद्र सेहवाग (९०) आणि गौतम गंभीर (१०२)ने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध मोहालीत असे केले होते.
६. अश्विनने सलग चार डावात कुमार संगकाराला आऊट केले.
७. अजिंक्य रहाणे आणि मुलरी विजयने श्रीलंकाविरोधात दुसऱ्या डावात १४० रन्सची  भागिदारी केली. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मणचा १०९ रन्सचा रेकॉर्ड मोडला. २०१०मध्ये त्यांच्या नावावर विक्रम होता.
८. परदेशात ओपनर खेळाडू म्हणून पहिल्या पाच डावात दोन शतके तडकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय ठरला. याआधी राहुल द्रविडने असा विक्रम केलाय.
९. १३ वर्षांनंतर टीम इंडियाने २० रन्सवर दोन विकेट दिल्यानंतर शतकी भागिदारी केली. याआधी २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्रेंटब्रिजमध्ये असे झाले होते.
१०. या मैदानावर तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारीचा रेकॉर्ड झाला. लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी १६४ रन्स करीत हा विक्रम केला. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा १६२ रन्सचा रेकॉर्ड मोडला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.