टीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड!

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच... 

DNA | Updated: May 3, 2015, 04:36 PM IST
टीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड! title=

मुंबई: टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच... 

त्यानं आपली मैत्रिण रितिका सजदेहला फिल्मी स्टाइलनं प्रपोज केलंय  ते ही बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये... रोहितनं इथंच रितिकाला मागणी घातली याच मैदानात त्याची सीरिअस क्रिकेटला सुरूवात झाली होती. २८ एप्रिलला रात्री रोहितनं रितिकाला प्रपोज केलं. 

२८ वर्षीय रितिका कफ परेड मुंबईची राहणारी आहे. ती एक स्पोर्ट्स मॅनेजर आहे. गेल्या सहा वर्षांपासून रोहित-रितिका एकमेकांना ओळखतात. या लव्हबर्ड्सनं आपलं नातं आणखी घट्ट करण्यासाठी योग्य तो वेळ घेतला, असं त्यांना वाटतं. 

रोहितनं अगदी फिल्मी स्टाइलमध्ये हातात अंगठी घेऊन रितिकाला प्रपोज केलं. रितिका रोहितची खूप मोठी फॅन आहे. त्याच्या प्रत्येक मॅचवेळी रितिका आपले फिंगर क्रॉस करून मॅच बघत असते. 

रोहित-रितिकाचा हा फोटो पाहून रोहितच्या अनेक फॅन्स नक्कीच घायाळ होणार. आता त्यांचं लग्न कधी आणि कुठे? ते आपल्याला लवकरच कळेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.