सचिनला ओपनिंगला खेळायला आवडायचं

प्रिन्स ऑफ कोलकाता सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पहिली भेट अंडर १९ शिबिर दरम्यान झाली होती, तेव्हा ही सचिन जड बॅटने बॅटिंग करत असतांना आपल्याला दिसला होता, असं सौरभ गांगुलीने सांगितलं.

Updated: Nov 5, 2014, 09:29 PM IST
सचिनला ओपनिंगला खेळायला आवडायचं title=

मुंबई : प्रिन्स ऑफ कोलकाता सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पहिली भेट अंडर १९ शिबिर दरम्यान झाली होती, तेव्हा ही सचिन जड बॅटने बॅटिंग करत असतांना आपल्याला दिसला होता, असं सौरभ गांगुलीने सांगितलं.

सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही आठवणी सांगितल्या.

टीम इंडियात कोणत्या क्रमावर बॅटिंग करणार या वादावर गांगुलीने हसत हसत सांगितलं, सचिनला मी जेव्हा विचारलं की, सचिन चौथ्या क्रमांकावर खेळणार का, सचिनचं यावर उत्तर होतं, मला ज्या नंबरवर बॅटिंगसाठी उतरवशील मी त्या नंबरवर खेळेनं, मात्र मला विचारलं तर मी सांगेन की मला ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळायला आवडतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.