भोळा नाही सचिन, पॉलिटिकल अॅनिमल आहे

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ग्रेग चॅपलवर आपल्या पुस्तकात खुलासा केल्यानंतर ऑस्ट्रेलियातून सचिनविरोधात गरळ ओकली जात आहे.

Updated: Nov 7, 2014, 07:08 PM IST
भोळा नाही सचिन, पॉलिटिकल अॅनिमल आहे title=

सिडनी : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ग्रेग चॅपलवर आपल्या पुस्तकात खुलासा केल्यानंतर ऑस्ट्रेलियातून सचिनविरोधात गरळ ओकली जात आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रमुख क्रिकेट पत्रकार रॉबर्ट क्रेडॉक याने सचिन आणि त्याच्या पुस्तकावर कठोर शब्दात टीका केली आहे. इतक नाही तर ऑस्ट्रेलियन मीडियाची सचिनला जनावर म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे.

फॉक्स स्पोर्ट्स वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात रॉबर्ट क्रेडॉकने सचिनला खरी-खोटी सुनावली आहे. त्याने सचिनला शूत्र, स्वकेंद्री आणि पॉलिटिकल अनिमल पर्यंत संभावना केली आहे. रॉबर्टनुसार सचिन स्वार्थी आहे.

सचिनने आपल्या चेहऱ्यावर आपला मुखवटा लावून ठेवला आहे. आपले करिअर बनविण्याच्या चक्करमध्ये सचिन सर्व वादापासून दूर ठेवले. आज जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा सर्व वादांना हवा देत आहे. जे चुकीचे आहे. पुस्तकाच्या विक्रीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगताला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी ‘भारत रत्न’सचिन तेंडुलकर याने अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंच्या उपस्थितीत आपली आत्मकथा ‘प्लेइंग इट माय वे’चे प्रकाशन केले. पुस्तकात सचिनने क्रिकेट संबंधी अनेक वाद विवादांचा उल्लेख केला आहे. यात ग्रेग चॅपल आणि मंकीगेट वादाचा उल्लेख करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.