सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी

मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलक यांने आपले क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले. याबाबत त्यांने तसे ट्विटर ट्विट केलेय.

Updated: Jul 31, 2015, 05:20 PM IST
सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलक यांने आपले क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याबाबत त्यांने तसे ट्विटर ट्विट केलेय. आज गुरुपौर्णिमा. आपले गुरु आचरेकर सर यांची आज खास भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटोही काढले. सचिनने आपल्या चाहत्यांसाठी हे फोटो फेसबुक आणि ट्विटर पोस्ट केलेत. ट्विटर ट्विट करताना म्हटलेय,Sought blessings of my Guru on this auspicious day - A happy #GuruPurnima to all

माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरूला विसरत नाही हे सचिन तेंडुलकरने दाखवून दिलंय. गुरूपौर्णिमेनिमित्ताने सचिन तेंडुलकर आपले गुरू रमाकांत आचरेकर यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी रमाकांत आचरेकर सरांचे त्याने आशीर्वाद घेतले. सचिनसह आचरेकर सरांचे माजी वित्यानंतर आचरेकर सरांच्या कुटुंबियांसोबत त्याने फोटोही काढून घेतले. सरांसोबत सकाळचा काही वेळ सचिनने घालवला. यावेळी क्रिकेटसह अन्य विषयांवरही या गुरूशिष्यानी चर्चा केली. सचिनने हे फोटो त्याच्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत. अतुल रानडे, समीर दिघे, नरेश चुरी, अजय कीर, आचरेकरांच्या कन्या कल्पना आणि विशाखा उपस्थित होत्या.

फेसबुक

 

Sought blessings of my Guru on this auspicious day - A happy #GuruPurnima to all

Posted by Sachin Tendulkar on Friday, 31 July 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.