क्रिकेटचे काही अपरिचित नियम

क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण खूप मन लावून मॅच पाहात असतात. पण असे काही नियम असतात जे अनेकांना माहित नसतात.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2016, 09:01 AM IST
क्रिकेटचे काही अपरिचित नियम title=

मुंबई : क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण खूप मन लावून मॅच पाहात असतात. पण असे काही नियम असतात जे अनेकांना माहित नसतात.

क्रिकेटचे काही अपरिचित नियम :

१. जेव्हा बॉल हरवतो : जेव्हा बॉल हरवतो तेव्हा फिल्डींग करणारी टीम बॉल हरवल्याची अपील करतात. त्यानंतर मग त्या बॉलला मृत घोषित केलं जातं आणि दुसरा बॉल दिला जातो. आधीच्या बॉलप्रमाणेच बॉल असणाऱ्या दुसऱ्या बॉलने खेळ सुरू केला जातो. पण बॉल हरवल्यानंतर फलंदाजाला त्याने पळून काढलेले रन असो किंवा फोर मारला असो त्याला ते रन मिळतात. 

२. अपील न केल्यास आऊट न देणं : कोणताही फलंदाज आऊट झाल्यानंतर अंपायर जो पर्यंत फिल्डींग करणारी टीम अपील करत नाही तो पर्यंत आऊट दिलं जात नाही. पण जर फलंदाज स्वत:च पवेलियनकडे निघाला तर अंपायर त्याला पुन्हा बोलावतो आणि तो डेड बॉल ठरवला जातो.

३. मांकडिंग : या नियमानुसार नॉन स्टाईकवर उभा फलंदाज जर बाॉल टाकण्याच्या अगोदरच क्रिज सोडत असेल गोलंदाज बॉलने स्टम्पवरच्या बेल उडवून त्याला आऊट करू शकतो. पण ही विकेट गोलंदाजाच्या खात्यात नाही जात. १९४७ मध्य़े भारताच्या वीनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या ब्रिल ब्राऊनला आऊट केलं होतं.

४. खेळाडू जखमी झाल्यास : खेळाडू जखमी झाल्यास त्याला मैदान सोडण्यापूर्वी अंपायरची अनुमती मागितली जाते. जर खेळाडूने न सांगता मैदान सोडलं तर समोरच्या टीमला ५ अतिरिक्त रन दिले जातात. बॉलर जर १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ मैदानाच्या बाहेर राहिल्यास त्याला पुन्हा तेवढ्या वेळेपुरता बॉलिंग करता येत नाही.  २००७ साली भारत आणि आफ्रिका यांच्यातील टेस्ट मॅचमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या इंनिगमध्ये १८ मिनिटं मैदानाच्या बाहेर होता. भारताने २ विकेट लवकर गमावले. पण सचिनला बॅटींगसाठी १८ मिनिटं येता नाही आलं.