सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

Updated: Jul 8, 2015, 04:34 PM IST
सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

भारतीय क्रिकेटचा ओळख असलेल्या या दोघांपैकी सचिनने आज गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त जुना फोटो शेअर करत गांगुलीला शुभेच्छा दिल्या.

भारतीय क्रिकेटमध्ये 'दादा' अशी ओळख असलेल्या गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला एक नवी ओळख दिली. आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीकडे पाहिले जायचे. गांगुलीने परदेशात विजय मिळवीत यशस्वी भारतीय कर्णधार होण्याचा मान मिळविला होता. तसेच त्याने अनेक युवा खेळाडूंना संधी देऊन, त्यांची कारकिर्द घडविली.

सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी आयुष्यातील बराच काळ एकत्र क्रिकेट खेळताना घालविला आहे. या दोघांची एकदिवसीय सामन्यातील सलामीची जोडी प्रसिद्ध होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.