ऑस्ट्रेलियात भारताचा ट्रिपल धमाका

ऑस्ट्रेलियामध्ये आज भारतीयांचाच ट्रिपल धमाका पाहायला मिळाला.

Updated: Jan 29, 2016, 08:08 PM IST
ऑस्ट्रेलियात भारताचा ट्रिपल धमाका  title=

सिडनी/मेलबोर्न: ऑस्ट्रेलियामध्ये आज भारतीयांचाच ट्रिपल धमाका पाहायला मिळाला. मेलबोर्नमध्ये पुरुष आणि महिलांच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकाही आपल्या खिशात टाकली. तर सिडनीमध्ये झालेल्या मिक्स डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसचा विजय झाला.

मेलबोर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 27 रननं पराभव केला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि विराट कोहली. या दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावल्या. या विजयामुळे टीम इंडियानं सीरिजही खिशात टाकली आहे.

तर त्याआधी मेलबोर्नमध्येच भारताच्या महिला संघानंही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयामुळे महिलांनीही ऑस्ट्रेलियाला हरवून सीरिज 2-0 नं जिंकली. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली मिताली राज.

तर तिकडे सिडनीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसचा विजय झाला आहे. सानिया-मार्टिनानं चेक रिपब्लिकच्या अँड्रिया लॅव्हाकोवा आणि ल्युसी रॅडेकाचा ७-६, ६-३ असा पराभव केला. या जोडीचा हा सलग ३६वा विजय आहे. सानियाचे कारकिर्दीतील हे सहावे ग्रँडस्लॅम आहे.