बोल्टला धक्का, गमवावं लागलं ऑलिम्पिक गोल्ड

वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टवर ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल पर करण्याची नामुष्की आली आहे.

Updated: Jan 25, 2017, 09:38 PM IST
बोल्टला धक्का, गमवावं लागलं ऑलिम्पिक गोल्ड  title=

मुंबई : वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टवर ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल पर करण्याची नामुष्की आली आहे. 2008ला झालेल्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये जमैकाच्या टीममध्ये असलेला नेस्टा कार्टर हा उत्तेजक चाचणीच्या पुर्नतपासणीमध्ये दोषी आढळला आहे. यामुळे जमैकाच्या टीमला गोल्ड मेडल परत करावं लागणार आहे.

2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जमैकाच्या टीमला फोर बाय हंड्रेड मीटर रिले रेसमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. हे गोल्ड मेडल आता त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या टीमला मिळणार आहे, तर जपानला सिल्व्हर आणि ब्राझिलला ब्रॉन्झ मेडल बहाल केलं जाणार आहे. उसेन बोल्टकडे आत्तापर्यंत नऊ गोल्ड मेडल होती पण आता त्याच्याकडे आठ गोल्ड मेडल राहणार आहेत.