इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर विराट मैदानातच भडकला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं.

Updated: Nov 26, 2016, 04:05 PM IST
इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर विराट मैदानातच भडकला  title=

मोहाली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं. इंग्लंडचा बॅट्समन बेन स्टोक्स आऊट झाल्यानंतर विराट आणि बेन स्टोक्समध्ये बाचाबाची झाली. या दोघांमध्ये वाद सुरु असताना अंपायरला मधे पडावं लागलं.

पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सनी इंग्लंडची चांगलीच दाणादाण उडवून दिली. इंग्लंडच्या पहिल्या पाच विकेट झटपट गेल्यानंतर बेअरस्टो आणि स्टोक्सनं इंग्लंडचा डाव सावरायला सुरुवात केली. या दोघांमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाल्यानंतर रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर पार्थिवनं स्टोक्सला स्टम्पिंग केलं आणि स्टोक्स 29 रनवर आऊट झाला. स्टोक्सची विकेट पडल्यानंतर कोहलीनं आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं आणि यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

पाहा कोहली-स्टोक्समधली बाचाबाची