विराट कोहलीची सलमान स्टाइल, फोटो वायरल

भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं जेव्हापासून खेळायला सुरूवात केलीय. तेव्हापासून कोणत्या न कोणत्या कारणानं तो चर्चेतच असतो. कधी आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी तर कधी खराब फॉर्मसाठी...

Updated: Aug 9, 2015, 02:45 PM IST
विराट कोहलीची सलमान स्टाइल, फोटो वायरल title=
सौजन्य. इंडिया.कॉम

कोलंबो: भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं जेव्हापासून खेळायला सुरूवात केलीय. तेव्हापासून कोणत्या न कोणत्या कारणानं तो चर्चेतच असतो. कधी आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी तर कधी खराब फॉर्मसाठी...

विराट कोहली आपल्या मस्तीतच असतो... कुणी कितीही टीका केली तरी त्याच्यावर काहीही परिणाम होऊ देत नाही. 

 

असंख्य फॅन्स

काही महिन्यांमध्ये कोहलीनं आपल्या बॅटिंगची काहीही धमाल केली नाहीय. तरीही विराट कोहलीच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. 

टॉवेलमध्ये विराट

सध्या टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे. नुकताच विराट कोहली टॉवेलमध्ये फिरतांना दिसला. प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनचं खराब प्रदर्शनावर तो चिंतेत दिसला. टॉवेलमध्ये फिरणाऱ्या कोहलीचे सिक्स पॅक अॅब्स आणि फिट बॉडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. विराटची बॉडी पाहूनच कळतं की, कोहली रोनाल्डोचा किती मोठा फॅन आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.