मॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ?

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मॅच जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाताना आपण प्रत्येक वेळी पाहतो.

Updated: Mar 12, 2016, 07:57 PM IST
मॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ? title=

मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मॅच जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाताना आपण प्रत्येक वेळी पाहतो. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्येही मला अशाच प्रकारे स्टंप उचलायचे आहेत अशी इच्छा धोनीनं व्यक्त केली आहे. 

हे स्टंप उचलण्याचं खरं कारणही धोनीनं सांगितलं आहे. हे स्टंप उचलणं म्हणजे रिटायरमेंटसाठी केलेला प्लॅन असल्याची प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. पण कोणत्या मॅचचा कोणता स्टंप आहे, ते आपल्याला माहिती नसल्याचंही तो म्हणाला आहे. 

रिटायर झाल्यानंतर मी सगळ्या मॅचचे व्हिडिओ बघिन तेव्हा कोणत्या मॅचचा कोणता स्टंप आहे ते लक्षात येईल, असं वक्तव्य धोनीनं केलं आहे.