पुन्हा दिसणार युवराज आणि सुरेश रैनाचा जलवा

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. डीवाय पाटील खेल अकादमीमध्ये होणाऱ्या १३व्या डीवायपाटील टी-२० स्पर्धेत हे दोघे खेळणार आहेत. ही स्पर्धा ४ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे.

Updated: Dec 31, 2016, 01:17 PM IST
पुन्हा दिसणार युवराज आणि सुरेश रैनाचा जलवा title=

मुंबई : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. डीवाय पाटील खेल अकादमीमध्ये होणाऱ्या १३व्या डीवायपाटील टी-२० स्पर्धेत हे दोघे खेळणार आहेत. ही स्पर्धा ४ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे.

या स्पर्धेत १६ संघ खेळत आहेत. विजेत्या संघाला १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेय. यात ३१ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी बाद फेरीत सात सामने असतील. 

रिलायन्स वन, टाटा स्पोर्ट्स क्लब, कॅनरा बँक, बीपीसीएल, सीएजी, एयर इंडिया, इंडियन ऑईल, डीवाय पाटील ए, डीवाय पाटील बी, स्टेट बँक ऑफ त्रवणकोर, ओएनजीसी, मुंबई कस्टम्स, आरबीआय, वेस्टर्न रेल्वे आणि जैन इरिगेशन हे संघ असतील.

भारत आणि इंग्लंड यांच्यात १५ जानेवारीपासून वनडे आणि टी-२० मालिकेला सुरुवात होतेय. न्यूझूलंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान व्हायरल फीव्हरमुळे रैनाला संपूर्ण मालिकेला मुकावे लागले होते. तर युवराज सिंह या वर्षी मार्चमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळलाय. त्यानंतर मात्र युवराज संघात खेळलेला नाहीये.