फेसबुकवर मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट, रवानगी जेलमध्ये

आता मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे चांगलेच महागात पडू शकते. सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’च्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे धोकादायक ठरणार आहे. एखाद्या तरुणीला तिसऱ्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली तर तुमची रवानगी थेट जेलमध्ये होईल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 15, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे चांगलेच महागात पडू शकते. सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’च्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे धोकादायक ठरणार आहे. एखाद्या तरुणीला तिसऱ्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली तर तुमची रवानगी थेट जेलमध्ये होईल.
फेसबुकवर सुंदर छायाचित्र पाहून अनेक जण फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. मात्र, तरूणींकडून बरेचवेळा ती रिक्वेस्ट रिजेक्ट केली जाते. मात्र, काही जण पुन्हा त्यांना रिक्वेस्ट पाठवितात. आता तर तिसऱ्यांदा रिक्वेस्ट पाठविली तर थेट तुरूंगाची हवा खायला लागेल, हे निश्चित.
फेसबुकच्या माध्यमातून मुलीला वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास देणे बेकायदा असल्याचे उत्तर प्रदेस पोलिसांनी म्हटले आहे. आता यापुढे फेसबुकवरील हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना एक परिपत्रक पाठविले आहे.

फ्रेंड रिक्वेस्टचा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ लाक रूपये दंड आणि ३ वर्षांचा तुरूंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. तशी तरतूद या परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याची तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.