सॅमसंगचा विंडोज फोन लवकरच बाजारात

सॅमसंगचा विंडोज फोन लवकरच भारतीय बाजारपेठेतही दाखल होतोय. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट `वेरिझोन`नं काही फोनची लिस्टींग केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 5, 2014, 09:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंगचा विंडोज फोन लवकरच भारतीय बाजारपेठेतही दाखल होतोय. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट `वेरिझोन`नं काही फोनची लिस्टींग केलीय. यामध्ये सॅमसंगच्या Ative SE या फोनचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा फोन दोन वर्षांच्या अॅग्रीमेंटवर उपलब्ध आहे.
सॅमसंग Ative SE ची वैशिष्ट्य...
* विंडोज ८ वर आधारीत असला तरी हा फोन लवकरच विंडोज ८.१ व्हर्जनवर अपडेट केला जाणार आहे.
* इनबिल्‍ट मेमरी : १६ जीबी, ६४ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
* ५ इंचाचा एच डी एमोल्ड डिस्प्ले
* गोरिला कॉर्निंग ग्लास ३ स्क्रीन
* २.३ गिगाहर्टझ क्वाड-कोअर प्रोसेसर
* २ जीबी रॅम
* १३ मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरा
* फूल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा
* २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* जीएसएम सिंगल सिम
* बैटरी: २६००mAh
* वायफाय : ८०२.११
* ब्‍लूटूथ: ४.०
वेरिझोनवर या फोनची किंमत आहे ३५,९०० रुपये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.