सिंधुदुर्गात सापडली शिवकालीन तोफ!

मालवणच्या किनारपट्टीवर एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना शिवकालीन तोफ साप़डली. गेल्या काही दिवसात अनेक शिवकालीन वस्तू सापडल्यानं वस्तुसंग्रहालयाची मागणी जोर धरु लागली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 21, 2013, 01:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या किनारपट्टीला ऐतिहासिक महत्व आहे. मालवणच्या किनारपट्टीवर एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना शिवकालीन तोफ साप़डली. गेल्या काही दिवसात अनेक शिवकालीन वस्तू सापडल्यानं वस्तुसंग्रहालयाची मागणी जोर धरु लागली आहे.
मालवणचं महत्त्व अधोरेखित होतं ते सिंधुदुर्ग किल्ल्यामुळं... शिवाजी महाराजांनी स्वत: बांधलेला किल्ला म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे. याच सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मालवणच्या किना-यावर दाखल झाल्यावर दर्शन होतं ते महाराजांचे गुरु मौनी महाराजांचं. या मौनी महाराज मंदिराजवळच एका जुन्या घरांचं खोदकाम करतांना शिवकालीन तोफ सापडलीय. त्यामुळं या तोफेशी ऐतिहासिक संदर्भ जोडले जातायत. तीनशे किलो वजनाची ही तोफ किनारपट्टी संरक्षणासाठी वापरली जात असल्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी याच किना-यावर पुरातन ब्रम्हपूर्ती सापडली होती. मालवणला शिवकालीन इतिहास असल्यानं हे अवशेष सापडतायत. मात्र सापडलेल्या अवशेषांचं मालवणमध्येच संग्रहालय बनवावं अशी मागणी यानिमित्तानं होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.