एसटीचा २३ एप्रिलपासून बेमुदत संप

एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2013, 11:21 AM IST

www.24taas.com,रत्नागिरी
एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे ४९वे राज्यव्यापी अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशानेचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. एसटी कामगारांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री चव्हाण दुर्लक्ष करीत असल्याचे थेट आरोप केला. तर राज ठाकरे यांनी दुसरे दुकान थाटण्याच प्रयत्न करू नका, असा टोला लगावला.

या अधिवेशनाच्यावेळी राज्य सरकारवर कामगार संघटनेच्या नेत्यानी तीव्र टीका केली. वेतन प्रस्तावापासून राज्य सरकारने केलेल्या घुमजावामुळे संतापलेल्या एसटी कामगारांनी २३ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार कामगारांच्या मागण्या मान्य करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाचे सरकारने थकवलेले १७६३ कोटी त्वरित द्यावेत, धुलाई भत्ता सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली. प्रस्ताव सादर करताना १७६३ कोटी देण्याचे म्हटले होते. मात्र त्यातही बदल करून केवळ वर्कशॉप कर्मचाऱ्यांनाच त्यासाठी पात्र करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे, असा आरोप कर्मचारी संघटनेने केलाय.
एसटीने आपल्या सेवेत बदल केला पाहिजे. सेवेचा चांगला दर्जा हवा. चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे कामागर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे कान पवारांनी टोचलेत. एसटीचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पुण्यात होणार आहे. या अधिवेशनाला मी नक्कीच उपस्थित राहिन, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं.