काँग्रेसने देशाची वाट लावली, शिव्या मात्र मला – नरेंद्र मोदी

By Surendra Gangan | Last Updated: Friday, November 8, 2013 - 18:53

www.24taas.com, झी मीडिया, बहराइच
देशात काँग्रेसविरोधी लाट आहे. काँग्रेसला पराभवाची भिती वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसवाले शंखनाद करीत सुटले आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. देशाचे वाट लावून मला शिव्या देण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचे मोदी यावेळी म्हणालेत.
नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी देशात काँग्रेसविरोधी लाट असून केवळ आपला पराजय होईल या भीतीनंच काँग्रेस शंखनाद करत असल्याचा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला. मी टीव्हीवर दिसलो नाही तरी चालेन पण जनतेच्या मनात राहिलो पाहिजे, असे ते म्हणालेत.
काँग्रेस सरकारवर टीका करताना मोदींनी उत्तर प्रदेश सरकारवरही कडाडून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातले गुन्हेगार मोकाट फिरतायत तर निर्दोष मात्र जेलमध्ये सडत असल्याची टीका त्यांनी अखिलेश यादव सरकारवर केली. उत्तर प्रदेशात मोठ्याप्रमाणात धान्य उत्पादन होत होते. देशाला पुरेल इतके अन्नधान्य उत्पादन येथे पिकू शकते. मात्र, नाकर्त्या सरकारमुळे ते होत नाही. भाजपला सत्तेत आणा आणि बघा कसा विकास होतो ते, असे आवाहन करीत मतांचा जोगवा मोदींनी मागितला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Friday, November 8, 2013 - 18:53


comments powered by Disqus