वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोप्या गोष्टी...

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, January 12, 2014 - 17:37

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:ला खूप त्रास दिला असेल... आणि काही दिवसांनंतर कंटाळून आपल्या व्रताला राम-राम म्हटलं असेल... पण, तुम्हाला स्वत:ला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. कारण, तुम्ही केवळ आपल्या दररोजच्या सवयींवर थोडंसं लक्ष ठेवलं, तरी तुमचा लठ्ठपणावर नियंत्रण ठेऊ शकाल... आम्ही सांगत आहोत अशाच काही सोप्या गोष्टी... ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा होईल.
न चुकता ब्रेकफास्ट हवा
अनेक निरीक्षणांमधून हेच पुढे आलंय, की तुम्ही दररोज न चुकता ब्रेकफास्ट घेतलात तर तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. पण, काही जण कॅलरीज कमी करण्याच्या नादात ब्रेकफास्ट घेणंच बंद करतात... असं जर तुम्ही करत असाल तर त्याचा तुम्हाला काही एक फायदा होणार नाही, हे निश्चित.
ब्रेकफास्ट बंद करण्याऐवजी तुम्ही दुपार किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी थोडं कमी खाऊन कॅलरीजवर नियंत्रण ठेऊ शकाल.
फळ खा
दिवसातून दोन वेळा तरी फळं खा. फळांमुळे तुमच्या चरबीवर नियंत्रण राहील तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाणंही फळांमुळे नियमित राहतं. आणि फळं खाल्ल्यामुळे तुम्ही तणावविरहीत राहाल.
संपूर्ण झोप घ्या
दिवसात आठ तासांची झोप प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते... आणि झोप ही तुमच्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. यामुळ तुमच्या कॅलरीजवरही नियंत्रण राहतं.
खाली बसून जेवण घ्या
जेवळ घेताना खाली बसा आणि मग शांतपणे जेवा... जेवताना टीव्ही पाहणं, मोबाईलवर बोलणं, मॅसेज करणं अशा गोष्टी टाळा. त्यामुळे तुमचं संपूर्ण लक्ष जेवणाकडेच राहील आणि तुम्ही योग्य प्रमाणात आहार घ्याल.
व्यायाम किती करावा आणि कधी?
तुम्हाला किती प्रमाणात व्यायामाची आवश्यकता आहे, हे तज्ज्ञांकडून अगोदर जाणून घ्या. तुम्हाला सोयीस्कर न ठरणाऱ्या वेळेत व्यायाम जबरदस्तीनं करणं टाळा कारण यामुळे तुम्ही लवकरच व्यायाम करण्याला बोअर व्हाल... आणि सरते शेवटी व्यायाम करणंच सोडून द्याल. तसंच व्यस्ततेमुळे किंवा इतर कामांमुळे तुम्हाला वेळाही पाळता येणार नाहीत. तेव्हा तुम्हाला सोयीस्कर पडतील अशा वेळा शोधून काढा. आणि स्वत:ला फारसा त्रास न देता वजनावर नियंत्रण ठेवा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 12, 2014 - 17:37
comments powered by Disqus