आता यूट्यूब व्हिडिओ निर्मात्यांसाठी मुंबईत मिळणार स्वतंत्र जागा

आताचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आपण केलेली प्रत्येक कृती सोशल मीडियावर टाकतो. यूट्यूब तर व्हिडिओचा खजाना आहे. स्वयंपाकापासून तर प्रत्येक घटनेचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करतो आणि लाखो व्ह्यूज मिळवतो.

Updated: Aug 20, 2015, 12:28 PM IST
आता यूट्यूब व्हिडिओ निर्मात्यांसाठी मुंबईत मिळणार स्वतंत्र जागा  title=

मुंबई: आताचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आपण केलेली प्रत्येक कृती सोशल मीडियावर टाकतो. यूट्यूब तर व्हिडिओचा खजाना आहे. स्वयंपाकापासून तर प्रत्येक घटनेचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करतो आणि लाखो व्ह्यूज मिळवतो.

यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूट्यूब व्हिडिओ निर्मात्यांशी थेट व्यावसायिक नातं जोडण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत यूट्यूबनं स्वत:ची जागा घेतलीय. गोरेगांवच्या चित्रपटनगरीतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमध्ये यूटय़ूबनं जागा घेतली असून तिथं संस्थेतील विद्यार्थ्यांबरोबरच यूटय़ूब व्हिडीओ निर्मात्यांना व्हिडीओनिर्मितीचे प्रशिक्षण मिळणार आहे. 

या प्रशिक्षण केंद्रात व्हिडिओचं चित्रीकरण, एडिटिंग आणि यूटय़ूबवर अपलोडिंगही करता येणार आहे. यूटय़ूबनं आत्तापर्यंत टोकियो, लॉस एंजेलिस, लंडन, न्यूयॉर्क, ब्राझील आणि बर्लिन इथं अशा प्रकारची 'यूटय़ूब स्पेस' निर्माण करून दिली आहे. मुंबईत सुरू होणारी देशातील पहिलीच 'यूटय़ूब स्पेस' असणार आहे. ही सुविधा २०१५च्या अखेपर्यंत सर्वासाठी खुली होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.