Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी कधीही वापरु नये, त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मक शक्ती आणतात

 चला जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या ना कोणाला द्याव्यात किंवा दुसऱ्याच्या वापराव्यात. 

Updated: May 1, 2022, 06:18 PM IST
Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी कधीही वापरु नये, त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मक शक्ती आणतात title=

मुंबई : आपण असे बरेच लोक पाहिले असतील की, जे आपल्या सगळ्या कामांसाठी दुसऱ्यावक अवलंबून असतात. एवढेच काय तर असे अनेक लोक आहेत. जे रोजच्या वापरातल्या वस्तुंसाठी देखील दुसऱ्यांवर अवलंबून असतात. असे करण्यामागे कदाचित पैसे वाचवणं हा त्यांचा उद्देश असला, तरी देखील असं करण हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे. त्याचप्रमाणे, अनेक वेळा आपण देखील आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांना देतो. परंतु असं करणं देखील आपल्यासाठी चुकीचं आहे. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या ना कोणाला द्याव्यात किंवा कोणाच्या वापराव्यात. 

लिपस्टिक

लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे, जी आपण इतरांकडून घेऊ नये. त्यामुळे मुलींनी दुसऱ्याची लिपस्टिक मागू नये आणि कोणी मागीतली तरी देखील ती देऊ नये.

दुसऱ्याचे कपडे

आपण कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या आत प्रवेश करते आणि जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. त्याच प्रमाणे जर कधी दुसऱ्याने आपले कपडे वापरले, तर आपण ते कपडे पुन्हा घालू नये. असं केल्याने आपल्यामध्ये देखील दुसऱ्या व्यक्तीची निगेटीव्ह शक्ती येऊ शकते.

पेन

बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे पेन नसलं की, आपण दुसऱ्यांकडून त्यांचा पेन घेतो. परंतु हे लक्षात ठेवा की, इतर वेळी हे ठिक आहे, परंतु महत्त्वाच्या कराराच्या वेळी किंवा कामाच्या वेळी आपला स्वतंत्र पेन वापरावा.

वास्तविक, वास्तुशास्त्रानुसार, आपण कधीही दुस-याची लेखणी आपल्याजवळ ठेवू नये. हे केवळ करिअरच्या दृष्टीने अशुभ मानले जात नाही, तर यामुळे तुमचे पैसेही बुडू शकतात.

अंगठी

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालने देखील अशुभ आहे. असे केल्याने माणसाचे आरोग्य, जीवन आणि आर्थिक आघाडीवर वाईट परिणाम होतो.

घड्याळ

वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशीही आहे. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे, फार अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो असे म्हणतात.

रुमाल

वास्तुशास्त्रानुसार, रुमाल दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ ठेवल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याला लोकांमधील मारामारी आणि भांडणांशी जोडून पाहिले जाते. त्यामुळे दुस-याचा रुमाल कधीही आपल्या सोबत ठेवू नये.