IND vs AUS: जड्डूच्या फिरकीवर नाचला कॅमरून ग्रीन; शेवटी 'तो' मिस्ट्री बॉल टाकला अन् उडवल्या दांड्या, पाहा Video

Ravindra Jadeja, WTC Final 2023: उमेश यादवने मार्नस लॅबुशेनला तंबुत पाठवलं. त्यानंतर मैदानात उतरला कॅमरॉन ग्रीन (Camron Green). कॅमरॉन ग्रीनने संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रोहितने पुन्हा रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलवलं.

Updated: Jun 10, 2023, 05:24 PM IST
IND vs AUS: जड्डूच्या फिरकीवर नाचला कॅमरून ग्रीन; शेवटी 'तो' मिस्ट्री बॉल टाकला अन् उडवल्या दांड्या, पाहा Video title=
Ravindra Jadeja, WTC Final 2023

Ravindra jadeja Bold Camron Green Video: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2023) बुधवारपासून सुरुवात झाली. ओव्हलवर सुरू झालेला हा सामना कोणं जिंकत याकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. सामना आता रंगतदार परिस्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची लीड घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे. अशातच आता दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाचा (Ravindra jadeja) भेदक मारा पहायला मिळतोय. जड्डू आपल्या फिरकीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवताना दिसतोय. 

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा कॅमरॉन ग्रीन (Camron Green) आणि मार्नस लॅबुशेन क्रिझवर होते. उमेश यादवने मार्नस लॅबुशेनला तंबुत पाठवलं. त्यानंतर मैदानात उतरला कॅमरॉन ग्रीन. कॅमरॉन ग्रीनने संयमी खेळी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रोहितने पुन्हा रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलवलं. जडेजाने सुरूवातीला अचूक लाईन लेंथवर बॉलिंग केली आणि धावा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जड्डूने बाहेरच्या टप्प्यात गोलंदाजी केली आणि फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जड्डूने पीचचा एक टप्पा राखून ठेवला होता. ग्रीन आता डिफेन्स करणार अशी शक्यता दिसत असताना जड्डूने टप्प्यात बॉल केला आणि ग्रीनची विकेट काढली.

बॉल टप्पा खाऊन उसळी घेईल, अशी शक्यता असताना बॉल कमी स्पीडमुळे खाली राहिला आणि ग्रीनच्या पॅडला लागून बॉल थेट स्टंपला जाऊन धडकला. जडेजाचा (Ravindra jadeja Wicket) हा बॉल पाहून खुद्द कॅमरून ग्रीनला देखील त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तर किपर भरत देखील स्तब्ध झाला. विकेट पडल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनाचा झाला. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Video Video) झाला आहे.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार लंच टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 200 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑस्ट्रेलियाकडे 373 मजबूत आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित विकेट लवकरात लवकर काढून फलंदाजीला उतरण्याचा मानस भारतीय टीमचा असेल.

आणखी वाचा - बोटाला गंभीर दुखापत तरीही मैदानात उतरला.. दादाला उत्तर देत म्हणाला, जिंकणारच!

ऑस्ट्रेलिया (Playing XI):

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

इंडिया (Playing XI):

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.