ऋद्धिमान साहावर संतापली सौरव गांगुली यांच्या जवळची व्यक्ती!

वद्धीमान साहाने गांगुली यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे.

Updated: Feb 22, 2022, 08:11 AM IST
ऋद्धिमान साहावर संतापली सौरव गांगुली यांच्या जवळची व्यक्ती! title=

श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजमध्ये क्रिेकेटर आणि विकेटकीपर वृद्धीमान सहाचा समावेश करण्यात आला नाही. यानंतर साहाने बीसीसीआय अध्यक्ष आणि कोच राहुल द्रविड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गांगुली यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान यावर आता गांगुली यांच्या भावाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

साहावर भडकले गांगुलींचे भाऊ

पत्रकारांशी बोलताना वृद्धीमान साहा म्हणाला होता, गांगुली यांनी मला सांगितलं होतं की, "जोपर्यंत मी बीसीसीआय अध्यक्ष आहे तोर्यंत तू टीममधील स्थानाविषयी चिंता करू नकोस. या वाक्याने माझा कॉन्फिडन्स वाढला होता." 

सौरव गांगुली यांचे भाऊ आणि बंगाल क्रिकेट संघाचे सचिन स्नेहाशीष गांगुली यांनी यावरून वृद्धीमान साहा यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, वृद्धीमान साहाने सिलेक्टर्स/बीसीसीआय यांच्याशी झालेलं संभाषण सर्वांसमोर आणून चूक केली आहे. वृद्धीमान बंगाल टीममधून बाहेर पडल्यानंतर रणजी ट्रॉफी देखील खेळू शकत होता.

स्नेहाशीष गांगुली पुढे म्हणाले, "हे माझं वैयक्तिक मत आहे. मला असं वाटतं की, त्याने या गोष्टी खाजगी ठेवायला हव्या होत्या. टीममधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खाजगी कारणं दिली होती आणि आम्ही त्याचा सन्मान केला. त्याला जेव्हा टीममध्ये सामील व्हायचं असेल तेव्हा त्यासाठी दरवाजे खुले आहेत."