Chief Selector: कोण होणार टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर? दिल्ली कॅपिटल्सच्या एका निर्णयाने मिळाले 'हे' संकेत

BCCI Chief Selector: भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी दिल्ली कॅपिटल्सबरोबरचा (Delhi Capitals) करार संपवल्यानंतर आता भारतीय पुरुष संघाचा निवडकर्ता बनण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानला जात आहेत.

Updated: Jun 29, 2023, 06:56 PM IST
Chief Selector: कोण होणार टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर? दिल्ली कॅपिटल्सच्या एका निर्णयाने मिळाले 'हे' संकेत title=
BCCI Chief Selector

Chief Selector of Team India: महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष (Chief Selector) कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. क्रिकेट सल्लागार समितीने उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं होतं. भारतीय पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदाची निवड शनिवारी होणं अपेक्षित आहे. असं असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी दिल्ली कॅपिटल्सबरोबरचा (Delhi Capitals) करार संपवल्यानंतर आता भारतीय पुरुष संघाचा निवडकर्ता बनण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानला जात आहेत.

अजित आगरकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना दिल्ली कॅपिटल्सने मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर आणि शेन वॉटसन यांच्याबरोबरचे मार्ग वेगळे केले आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली कॅपिटल्सने माहिती दिली आहे. तुमचं दिल्ली कॅपिटल्सच्या घरात नेहमी स्वागत आहे. तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल खुप खुप धन्यवाद, असं म्हणत दिल्लीने दोघांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या या निर्णयानंतर आता अजित आगरकर टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर्स (BCCI Chief Selectors) होणार हे पक्कं मानलं जातंय. अजित आगरकर आणि शेन वॉटसन हे दोन्ही दिग्गज खेळाडू 2022 पासून दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर आता ते टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर होणार का? अशी चर्चा सुरू झालीये. अलीकडे बीसीसीआयने निवडकर्ता पदासाठी अर्ज मागवले होते, ज्यासाठी 30 जून ही शेवटची तारीख आहे.

आणखी वाचा - ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, भारतीय संघातील मुख्य निवडकर्त्याचे पद फेब्रुवारी २०२३ पासून रिक्त आहे. माजी निवडकर्ते चेतन शर्मा (Chetan Sharma) यांचं झी मीडियाने स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर माजी क्रिकेटपटू शिवसुंदर दास (Shivsundar Das) संघातील मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे आता ही जबाबदारी कोण सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बीसीसीआयची सध्याची निवड समिती

शिव सुंदर दास - कसोटीः २३, एकदिवसीयः ४
सुब्रतो बॅनर्जी - कसोटी: 1, एकदिवसीय: 6
सलील अंकोला - कसोटी: 1, एकदिवसीय: 20
श्रीधरन शरथ - प्रथम श्रेणी: 139, यादी अ: 116