Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच

Asia Cup 2023 भारतीय क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी एका महत्त्वाच्या चाचणीतून सामोरं जावं लागणार असल्यामुळं संघात निवड होणं त्यांच्यासाठी पुरेसं नाही...

सायली पाटील | Updated: Aug 24, 2023, 11:52 AM IST
Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच  title=
Asia Cup 2023 Indian Cricket Team to go through fitness test

Indian Cricket Team to go through Fitness Test For Asia Cup 2023: भारतीय क्रिकेटपटूंची मैदानातील जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कारण, आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी संघाची निवड झाली असून, आता खेळाडूही तयारीला लागले आहेत. पण, संघात स्थान मिळालं म्हणजे विषय संपला असा तुमचा समज असेल तर, तसं नाहीये. कारण, आता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना आणखी एक टप्पा ओलांडल्यानंतरच संघातून खेळता येणार आहे. 

काय आहे ही परीक्षा? 

भारतीय संघ आशिया चषकापूर्वी बंगळुरू येथील अलूरमध्ये 6 दिवसांच्या शिबिरापासून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात करेल. ज्यानंतर संघ मैदानात नव्या जोमानं उतरण्यासाठी तयार असेल. हे 6 दिवस रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यापासून जडेजा आणि सिराज यांच्यापर्यंत प्रत्येकासाठी तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण, खेळाडूंना सर्वप्रथन Fitness Test द्यावी लागणार आहे. 

कशी असेल चाचणी? 

संघातील जे खेळाडू आयर्लंड दौऱ्यात सहभागी नव्हते आणि वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ते संघातून पुनरागमन करत आहेत अशा खेळाडूंना 13 दिवसांचं फिटनेस रुटीन देण्यात आलं आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसमुहाच्या माहितीनुसार संघासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व खेळाडूंना Full Body Check Up करावं लाहणार आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीतील काही तज्ज्ञ मंडळी खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांना शेरा देतील आणि त्यानंतरच ते संघात अधिकृतरित्या सहभागी होऊ शकणार आहेत. 

खेळाडूंचा Fitness Progtamme 

- शारीरिक सुदृढतेवर भर, खांद्यांची काळजी 
- खेळाडूंच्या ताकदीवर लक्ष 
- प्रत्येक खेळाडूसाठी खास Plan आणि दिनचर्या 
- प्रत्येक खेळाडूला गरजेनुसार प्रोटीन, जीम सेशन, चालणं, धावणं आणि स्विमिंग सेशन 

हेसुद्धा वाचा : Asia cup 2023 : टीम सिलेक्शनवेळी Ajit Agarkar यांच्या 3 चुका पडणार महागात? कसा जिंकणार एशिया कप?

बीसीसीआयशी (BCCI) संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन महिन्यांदरम्यान खेळाडू शारीरिकदृष्टी सुदृढ राहावेत यासाठी त्यांच्याच दृष्टीनं ही चाचणी आखण्या आली आहे. यामाध्यमातून आखून दिलेल्या Plan चं पालन कोणत्या खेळाडूंनी केलं आणि कोणत्या खेळाडूंनी त्याकडे दुर्लक्ष केलं हेसुद्धा सहज लक्षात येणार आहे. ज्यानंतर संघ व्यवस्थापन मंडळ खेळाडूंबद्दलचा निर्णय घेईल. संघातील नवे आणि जुने असे सर्वच खेळाडू या चाचणीला सामोरे जाणार असल्यामुळं आता हा टप्पा कोण ओलांडतं आणि इथं कोण अडखळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.