Asia cup 2023 : येत्या 30 तारखेपासून एशिया कपला ( Asia cup 2023 ) सुरुवात होणार आहे. नुकतंच एशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाने ( Team India ) श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचं कमबॅक झालं आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचे स्टार स्पिनर गोलंदाज य़ुझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि रविचंद्रन अश्विन यांना टीममध्ये जागा मिळवणं शक्य झालं नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे कोच अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीम घोषणा केली. मात्र यावेळी 3 मोठ्या चुका झाल्या आहेत, ज्यामुळे टीम इंडियावर एशिया कप गमावण्याची नामुष्की ओढावू शकते.
सिलेक्शन समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडून टीमचं सिलेक्शन करताना काही त्रुटी राहिल्या आहे. या त्रुटी नेमक्या कोणत्या आहेत, यावर एक नजर टाकूया.
एशिया कपममध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना टीममध्ये जागा देण्यात आली आहे. मात्र अजूनही प्रश्न असा उपस्थित होतोय की, राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला टीममध्ये जागा का देण्यात आली. याबाबतीत अजित आगरकर यांनी माहिती दिली की, राहुल आशिया कप 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता राहुलच्या जागी निवडकर्त्यांना इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देता येणं शक्य झालं असतं.
एशिया कप 2023 च्या टीममध्ये नवखा खेळाडू तिलक वर्माला संधी देण्यात आली. त्याला संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. मुख्य म्हणजे तिलक वर्माने टीम इंडियाकडून एकंही वनडे सामना खेळला नाहीये आणि तरीही त्याला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तिलक वर्माच्या जागी टीम इंडियामध्ये फलंदाज शिखर धवन याचा समावेश करणं शक्य झालं असतं.
एशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाला सर्व सामने श्रीलंकेत सर्व सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेतील खेळपट्टीवर स्पिनर्सला खूप मदत मिळू शकते हा विचार करायला हवा होता. रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे फिरकीचा अनुभव चांगला होता. त्यामुळे या दोघांचाही समावेश टीममध्ये असणं गरजेचं होतं.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.