IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर

पत्रकाराने IPL बाबत अस काय विचारल की, बाबर आझमची बोलतीच बंद झाली, पाहा VIDEO

Updated: Nov 12, 2022, 07:47 PM IST
 IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर  title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात 13 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) आमने सामने येणार आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ टी20 वर्ल्ड कप 2022 वर नाव कोरणार आहे. या सामन्यापुर्वी आता दोन्ही संघाची पत्रकार परिषद पार पडलीय. या पत्रकार परिषदेत दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांना आव्हान देत असतात. त्यात आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची खुप चर्चा आहे. 

हे ही वाचा : T20 World Cup की FIFA? कोणत्या स्पर्धेतून खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात, जाणून घ्या

फायनल सामन्यापुर्वी बाबर आझमची (Babar Azam) पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत बाबर आझम एका प्रश्नावर उत्तरच देऊ शकला नाही आहे. हा प्रश्न आयपीएल (IPL) संदर्भात होता. मात्र यावर त्याची बोलतीच बंद झाली होती. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. 

काय झाल पत्रकार परिषदेत? 

फायनल सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) आयपीएलवर प्रश्न विचारला.त्यावर बाबर आझम याची बोलतीच बंद झाली होती. या प्रश्नाचे उत्तर बाबरला अजिबात देता आले नाही आणि तो संघाच्या मीडिया मॅनेजरकडे पाहू लागला, तेव्हा मॅनेजरने यावेळी फक्त वर्ल्ड कपशी संबंधित प्रश्न विचारले जावेत असे सांगून, पत्रकाराच्या प्रश्नातून काढता पाय घेतला. 

प्रश्न काय होता?

"आयपीएल खेळण्याच्या फायद्यांबद्दल बोलताना, तुम्हाला आणि तुमच्या संघाला मदत होईल असे तुम्हाला वाटते आणि भविष्यात तुम्हाला अशी काही आशा आहे का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता.मात्र या प्रश्नावर बाबरची बोलती बंद झाली होती. दरम्यान आयपीएलबाबत बोलायच झालं तर, पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाहीत. पाकिस्तानी खेळाडू 2009 पासून आयपीएल खेळलेले नाहीत.

दरम्यान पाकिस्तानने 2009 तर इंग्लंडने 2010 चा वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकला आहे. आता दोन्ही संघ आपापले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.