भारतात पिंक बॉल कसोटी सामने इतिहास जमा होणार, 'या' कारणाने बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

Team India : भारतीय मैदानावर आता पिंक बॉल कसोटी सामने खेळवले जाणार नाहीत. बीसीसीआयने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने पिंक बॉल क्रिकेट इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.   

राजीव कासले | Updated: Dec 11, 2023, 01:21 PM IST
भारतात पिंक बॉल कसोटी सामने इतिहास जमा होणार, 'या' कारणाने बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय title=

Team India Pink Ball Cricket : भारतीय क्रिकेट संघ आता डे-नाईट कसोटी क्रिकेट (Day-Night Test Match) सामने खेळताना दिसणार नाही. डे-नाईट क्रिकेट सामने पिंक बॉलने (Pink Ball) खेळवले जातात. भारतीय मैदानावर या सामन्यांच्या आयोजनाबाबत बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पिंक बॉल कसोटी सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पुरुष किंवा महिला संघाच्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जाणार नाही.

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय पिंक बॉल कसोटी क्रिकेटसाठी उत्सुक नाही. कारण 4-5 दिवस चालणारा कसोटी सामना अवघ्या 2-3 दिवसात संपतो. 

बीसीसीआयने का घेतला हा निर्णय
बीसीसीायकडून पिंक बॉल कसोटी क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी शक्य तो सर्व प्रयत्न करण्यात आले. पण पिंक बॉल कसोटी सामने केवळ 2-3 दिवसात संपतात असा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. क्रिकेट चाहते 4 ते 5दिवसांचा कसोटी सामने पाहण्यासाठी आलेले असता. अनेक जण पाच दिवसांच्या कसोटी  सामन्यांच्या उद्देशाने तिकिंट काढतात. पण त्यांची निराशा होते, असं जय शहा यांनी सांगितंल. शेवटचा पिंक बॉल कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने आयोजित केला होता. पण यानंतर कोणत्याच देशाने पिंक बॉल सामन्याचं आयोजन केलं नाही. 

पिंक बॉल कसोटीत भारताचा रेकॉर्ड
टीम इंडियाने आतापर्यंत 4 पिंक बॉल कसोटी सामने खेळली आहे. यात तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) शेवटचा पिंक बॉल कसोटी सामना श्रीलंकेविरोधात खेळला होता. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेला हा सामना केवळ 3 दिवसात संपला. भारतीय महिला संघाने केवळ एक पिंक बॉल कसोटी सामना खेळला आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला आणि ऑस्ट्रलिया महिला संघात हा सामना खेळवण्यात आला होता. क्विन्सलँडमध्ये झालेला हा सामना ड्रॉ झाला होता. 

बीसीसीआयच्या स्पष्टीकरणानंतर आता भारतात पिंक बॉल कसोटी सामने इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 26 डिसेंबरपासून दोन कसोटी सामने रंगणार आहेत. हे दोन्ही कसोटी सामने् रेड बॉलने खेळवले जातील.