महिला संघासाठी परदेश दौऱ्यांचे आयोजन

भारतीय महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप फायनल गाठल्यानंतर आता बीसीसीआय महिला क्रिकेट टीमसाठी पुरुषांप्रमाणेच परदेश दौरे आयोजित करतंय. 

Updated: Oct 3, 2017, 10:37 PM IST
महिला संघासाठी परदेश दौऱ्यांचे आयोजन title=

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप फायनल गाठल्यानंतर आता बीसीसीआय महिला क्रिकेट टीमसाठी पुरुषांप्रमाणेच परदेश दौरे आयोजित करतंय. 

येत्या दोन वर्षात भारतीय टीम वन-डे आणि टी-20 क्रिकेट बलाढ्य टीमसोबत खेळणार आहे. परदेश दौ-याबरोबरच स्थानिक क्रिकेटचा दर्जा सुधारण्यावरही बीसीसीआय भर देणार आहे. आता झोनल अंडर-15 वुमेन्स क्रिकेटही होईल आणि यामुळे आपल्याला आणखी उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू मिळण्यास मदत होणार आहे. 

वर्ल्ड कपनंतर मिथाली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मनधाना आणि पूनम राऊतसारखी नावं आता घराघरात पोहचली आहे. तसंच बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेटचा दर्जाही सुधारण्यास मदत होईल.