रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

राजीव कासले | Updated: Feb 26, 2024, 05:48 PM IST
रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही title=

India Vs England Test Series: टीम इंडियाने रांचा कसोटीत इंग्लंडवर पाच विकेटने मात केली (India beat England). या विजयाबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी जिंकली. आता पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला इथं खेळवला जाणार आहे. 

टीम इंडियाला भारतात हरवणं कठिण
टीम इंडियाने आपल्या घरात ही सलग 17वी कसोटी मालिका ठरली आहे. 2012 मध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका हरली होती. त्यानंतर टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत भारतात खेळवण्यात आलेली एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंडविरुद्ध तर टीम इंडियाने मालिका विजयाची हॅटट्रीक केली आहे. याआधी टीम इंडियाने दोनवेळा इंग्लंडला हरवलं आहे. 

स्वत:च्या देशा सलग 17 कसोटी सामने जिंकणारी भारत हा पहिला संघ आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्टेलिया असून ऑस्ट्रेलियाने सलग 10 कसोटी सामने जिंकलेत. सलग दहा कसोटी सामने जिंकण्याची किमया ऑस्ट्रेलियाने दोनवेळा केली आहे. नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 दरमयान ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा तर जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने सलग दहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पण टीम इंडियाने सलग सतरा सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. (Team India 17th Consecutive Test Series Win )

टीम इंडियाचा सलग 17 वा कसोटी मालिका विजय
1. ऑस्ट्रेलिया :  भारतने 4-0 (4) अशी जिंकली मालिका, फेब्रुवारी 2013
2. वेस्टइंडीज : भारताने 2-0 (2) अशी जिंकली मालिका, नोव्हेंबर 2013 
3. दक्षिण आफ्रीका : भारताने 3-0 (4) अशी जिंकली मालिका, नोव्हेंबर 2015 
4 .न्यूझीलंड : भारताने 3-0 (3) अशी जिंकली मालिका, सप्टेंबर 2016
5. इंग्लंड: भारताने 4-0 (5) अशी जिंकली मालिका,नोव्हेंबर 2016
6. बांगलादेश : भारताने 1-0 (1) अशी जिंकली मालिका, फेब्रुवारी 2017
7. ऑस्ट्रेलिया : भारताने 2-1 (4) अशी जिंकली मालिका, फेब्रुवारी 2017
8. श्रीलंका : भारताने 1-0 (3) अशी जिंकली मालिका, नोव्हेंबर 2017
9. अफगानिस्तान : भारताने 1-0 (1) अशी जिंकली मालिका, जून 2018 
10. वेस्टइंडीज : भारताने 2-0 (2) अशी जिंकली मालिका, ऑक्टोबर 2018 
11. दक्षिण आफ्रीका : भारताने 3-0 (3) अशी जिंकली मालिका, ऑक्टोबर 2019 
12. बांग्लादेश : भारताने 2-0 (2) अशी जिंकली मालिका, नोव्हेंबर 2019
13. इंग्लंड : भारताने 3-1 (4) अशी जिंकली मालिका, 2020-2021
14. न्यूजीलंड: भारताने 1-0 (2) अशी जिंकली मालिका, 2021 
15. श्रीलंका: भारताने 2-0 (2) अशी जिंकली मालिका, 2022
16.ऑस्ट्रेलिया: भारताने 2-1 (4) अशी जिंकली मालिका, 2023
17. इंग्लंड : भारत 3-1 (5) अशी मालिकेत आघाडी, एक सामना बाकी

11 वर्षांपूर्वी इंग्लंडचा विजय
भारतीय जमिनीवर इंग्लंडने 2012-13 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. म्हणजे 11 वर्षांपूर्वी इंग्लंडने हा विजय मिळवला होता. इंग्लंड क्रिकेट संघ भारतात आतापर्यंत 17 कसोटी मालिका खेळला आहे. यातले 5 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर 9 कसोटी मालिकांमध्ये भारताने जिंकल्या आहेत. 3 कसोटी मालिका ड्रॉ राहिल्यात. भारत आणि इंग्लडदरम्यान आतापर्यंत एकूण 36 कसोटी मालिका खेळवण्यात आल्यात. यात भारताने 12 कसोटी मालिका जिंकल्यात तर 19 कसोटी मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागलाय. 5 कसोटी मालिका ड्रॉ झाल्यात.

रांची कसोटीत भारतीय टीमची प्लेइंग-11: यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

रांची कसोटीत इंग्लंडची प्लेइंग-11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन, शोएब बशीर.

भारत Vs इंग्लंड कसोटी मालिका
1st टेस्ट: 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजयी)
2nd टेस्ट: 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत 106 धावांनी विजयी)
3rd टेस्ट: 15-19 फेब्रुवारी, राजकोट (भारत 434 धावांनी विजयी)
4th टेस्ट: 23-27 फेब्रुवारी, रांची (भारत 5 विकेटने विजयी)
5th टेस्ट: 7-11 मार्च, धर्मशाला