तीन वेळा आत्महत्येचा विचार, शहरही सोडलं... आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

जीवनात अनेक संकटं आली, पण तो हरला नाही त्याच ताकदीने तो पुन्हा उभा राहिला... 

Updated: Sep 3, 2022, 10:04 PM IST
तीन वेळा आत्महत्येचा विचार, शहरही सोडलं... आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू title=

Cricket News : टीम इंडियाच्या (Team India) स्टार खेळाडूचा आज वाढदिवस आहे. पण या स्टार खेळाडूला जीवनात मोठा संघर्ष करावा लागला आहे. वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. तब्बल तीन वेळा त्याने आत्महत्येचाही विचार केला. पण आलेल्या संकटांना धैर्याने सामोरं जाण्याचा त्याने निर्णय घेतला आणि आज तो टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू बनलाय. 

हा खेळाडू आहे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohhamed Shami). संघर्ष काळात शमीला आपलं शहर सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळावं लागलं. तिथे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) साथ मिळाली आणि सुरु झाला मोहम्मद शमीच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात.

असा झाला शमीचा प्रवास
3 सप्टेंबर 1990 ला शमीचा जन्म झाला. आपल्या रिवर्स स्विंगने मोठमोठ्या फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या शमीची गणना आज जगातल्या नामवंत गोलंदाजांमध्ये होते. पण एक काळ असा होता जेव्हा शमी आत्महत्येचा विचार करत होता. पण त्याने स्वत:ला कठिण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आणखी मजबूत बनवलं. 

उत्तर प्रदेशने केला कानाडोळा
मोहम्मद शमीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बंगाल संघाकडून (Bangal Team) केली. शमीला उत्तर प्रदेश संघाकडून (Uttar Pradesh) खेळण्याची इच्छा होती. पण राजकारणामुळे त्याच्याकडे कानाडोळा करण्यात आला. चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला एकोणीस वर्षाखालील संघात स्थान देण्यात आलं नाही. पण निराश होऊन शमीने पश्चिम बंगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

शमीच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट
याचदरम्यान सराव शिबिरात शमीला भारतीय संघाचा स्टार फलंदाज सौरभ गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. हाच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट ठरला. शमीच्या गोलंदाजीवर गांगुली इतका प्रभावित झावा की त्याने बंगाल निवड समितीला शमीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं. अखेर तो क्षण आला. शमीला बंगलाच्या रणजी संघात स्थान मिळालं. रणजी क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप उमटवली. त्यामुळे भारतीय संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी खुले झाले. जानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पदार्पण केलं.

3 वेळा आत्महत्येचा विचार
2020 मध्ये शमीने रोहित शर्माबरोबर इंस्टाग्राम लाईव्हमध्ये आपण तीन वेळा आत्महत्येचा विचार केल्याचा खुलासा केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती सतत त्याच्याबरोबर असायची. 2015 वर्ल्ड कपदरम्यान शमी दुखापतग्रस्त झाला. यातून बाहेर पडायलात्याला तब्बल 18 महिने लागले.

यातून बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्यासमोर नवं संकट उभं ठाकलं. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले. प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. यादरम्यान त्याला कुटुंबियांकडून आणि टीम इंडियाकडून चांगला पाठिंबा मिळाला. याच कारणाने त्याने मैदानावर जोरदार पुनरागमन केलं.