शिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!

२००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत

Updated: May 31, 2017, 05:46 PM IST
शिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!  title=

लंडन : २००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, याचाच प्रत्यय बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यावेळी आला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यावेळी धोनी भारतीय खेळाडूंसाठी मैदानात ड्रिंक्स घेऊन आला. टीममध्ये बारावा खेळाडू जी भूमिका पार पाडतो ती धोनीनं पार पाडली.

ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा धोनी पाणी आणि एनर्जी ड्रिंकनी भरलेल्या बाटल्यांची बॅग घेऊन मैदानात आला आणि त्यानं वयानं लहान असलेल्या खेळाडूंना पाणी पाजलं. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये कॅप्टन विराट कोहलीनंही बारव्या खेळाडूची भूमिका पार पाडली होती. मैदानात जाऊन कोहलीनं रहाणेबरोबर मॅचच्या रणनितीबरोबर चर्चा केली. यावेळी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवलाही पाणी दिलं होतं.