Eng vs WI: अरेरे ! दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली टीम फक्त इतक्या रनवर ऑलआऊट

 इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गनने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Updated: Oct 23, 2021, 09:41 PM IST
Eng vs WI: अरेरे ! दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली टीम फक्त इतक्या रनवर ऑलआऊट  title=

Eng vs WI T20WC 2021 : टी20 वर्ल्ड कप 2021 च्या 14 व्या सामन्यात दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली वेस्ट इंडिजची टीम आज संघर्ष करताना दिसली. दुबईमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात वेस्टइंडीजची संपूर्ण टीम फक्त 55 रनवर ऑलआऊट झाली. इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गनने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (west indies all out on 55 runs)

आधी बॅटींग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघ 14.2 ओव्हर मध्ये फक्त 55 रन करु शकली. ज्यासाठी त्यांनी सगळ्या विकेट गमवल्या. इंग्लंड पुढे आता विजयासाठी 56 रनचं आव्हान असणार आहे.

वेस्टइंडीजची सुरुवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला इविन लुईस फक्त 6 रनवर आऊट झाला. दुसरा ओपनर लेंडल सिमंस देखील जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. मोइन अलीच्या बॉलवर तो 3 रन करत परतला. हेटमायरने 9 रन तर क्रिस गेलने 13 रन केले. 

ब्रावो 5 रनवर आऊट झाला. पूरनने फक्त 1 रन केला. आंद्रे रसेल शुन्यावर आऊट झाला. कर्णधार किरोन पोलार्ड 6 रनवर आऊट झाला. आदिल राशिदने 2.2  ओव्हरमध्ये 2 रन देत 4 विकेट घेतले.